IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय

WhatsApp Group

IND vs ZIM : भारताच्या प्रमुख खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवण्यात आले नसले तरी, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने शानदार कामगिरी करत पहिल्या सामन्यात यजमानांना 10 गडी राखून पराभूत केले आहे. भारतीय संघाने एकाच देशाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा सलग 13वा एकदिवसीय सामना जिंकला आहे.

2013 पासून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यांमध्ये झिम्बाब्वेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी हा विक्रम आहे की एका देशाविरुद्ध सलग इतके एकदिवसीय सामने जिंकण्यात संघ यशस्वी ठरला आहे. भारताचा यापूर्वीचा सर्वोत्तम खेळ बांगलादेशविरुद्ध होता. भारताने 1988 ते 2004 पर्यंत बांगलादेशविरुद्ध 12 सामने जिंकले होते.

या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ 189 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर शुभमन गिल (नाबाद 82) आणि शिखर धवन (नाबाद 81) या दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावत संघाला 10 विकेट्सनी विजय मिळवून दिला आणि मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. भारताकडून गोलंदाजीमध्ये दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, फिरकीपटू अक्षर पटेलनेह तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय, मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली.

भारत- झिम्बाव्वे उर्वरीत एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
दुसरा सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब