भारताचा बांगलादेश दौरा : येथे पहा वनडे आणि कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

WhatsApp Group

India vs Bangladesh: न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आता बांगलादेशला रवाना होणार आहे. 4 डिसेंबरपासून भारतीय संघ 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेशला पोहोचत आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल. ज्याचा पहिला सामना रविवार 4 डिसेंबर रोजी होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल हे सर्व खेळाडू टीम इंडियात या दौऱ्यासाठी परतत आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन या खेळाडूंना या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना ७ डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेतील शेवटचा सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहे. भारत-बांगलादेश मालिकेतील तीनही सामने मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. याशिवाय, दोन्ही संघांमधील 2 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान चितगाव येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाईल. या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ढाका येथे 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.

भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शारदा सुंदर ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा