
Women’s Asia Cup T20 2022 Semi Final: महिला आशिया चषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने थायलंड 74 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 149 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात थायलंडचा संघ केवळ 74 धावा करू शकला. भारताकडून शेफाली वर्माने 42 धावांची शानदार खेळी केली. तर दीप्ती शर्माने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. त्याने 3 बळी घेतले. दीप्तीने 4 षटकात केवळ 7 धावा दिल्या आणि एक मेडन षटकही टाकली.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंड संघाकडून नट्टाया बोचथमने सर्वाधिक 21 धावा केल्या. कर्णधार नरुमोल चाईवाईने 41 चेंडूत 21 धावा केल्या. या दोघांशिवाय दुहेरी आकड्यालाही कोणी स्पर्श करू शकले नाही.
भारताकडून दीप्तीने अप्रतिम गोलंदाजी दाखवली. तिने 4 षटकात 7 धावा देऊन 3 बळी घेतले आणि एक मेडन षटक देखील काढले. राजेश्वरी गायकवाडने 4 षटकात केवळ 10 धावा देत 2 बळी घेतले. रेणुका सिंगने 2 षटकात 6 धावा दिल्या आणि ब्रेकथ्रू मिळवला. स्नेह राणाने 4 षटकात 16 धावा देत 1 बळी घेतला. शेफालीने 2 षटकात 9 धावा देत एक विकेट घेतली. राधा यादवला एकही विकेट मिळाली नाही.
India storm into the final of #WomensAsiaCup2022 👏
🏏 Scorecard: https://t.co/oKQEC2eKqn
📸 @BCCIWomen pic.twitter.com/AhmKLBtelE
— ICC (@ICC) October 13, 2022
शेफालीने भारतासाठी चांगली फलंदाजी केली. तिने 28 चेंडूत 42 धावा दिल्या. यावेळी शेफालीने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 36 धावा दिल्या. या खेळीत त्याने 4 चौकार मारले. जेमिमा रॉड्रिग्जने 26 चेंडूत 27 धावा केल्या. तिने 3 चौकार मारले. पूजा वस्त्राकरने 13 चेंडूत 17 धावा केल्या. स्मृती मानधनाने 13 धावा केल्या.
महिला T20 आशिया कप 2022 चा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे. अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.