भारताच्या महिला कबड्डी टीमने जिंकलंं गोल्ड; आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच पदकांचे शतक

0
WhatsApp Group

आशियाई खेळ 2023 मध्ये भारताने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. महिला कबड्डी स्पर्धेत भारताने आता सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात खेळला गेला. हा रोमहर्षक सामना भारतीय महिला कबड्डी संघाने 26-25 अशा फरकाने जिंकला. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे 100 वे पदक आहे. त्यामुळे हे पदक विशेष मानले जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आजपर्यंत कधीही 100 पदके जिंकली नव्हती. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारताने शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कसा झाला अंतिम सामना?

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डीमध्ये भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याबद्दल सांगायचे तर हा सामना खूपच रोमांचक होता. दोन्ही संघांमध्ये हा सामना अगदी जवळून खेळला गेला. जिथे कधी भारत तर कधी चायनीज तैपेई संघ आघाडी घेत होता. या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण त्यानंतर भारतीय महिला संघाने बचावात आघाडी गमावली. पूर्वार्धानंतर भारतीय महिला संघ 14-9 ने आघाडीवर होता.

उत्तरार्धाच्या सुरुवातीलाही भारताने आपली आघाडी कायम ठेवली आणि एकवेळ 16-9 अशी आघाडी घेऊन भारताने चायनीज तैपेईला खूप मागे सोडले. मात्र येथून चायनीज तैपेईने पुनरागमन करत भारताची आघाडी बरीच कमी केली. भारतीय महिला संघाने बचावात केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला आणि सामन्यात पुनरागमन करत 14-16 अशी बरोबरी साधली. येथे सामना खूपच रोमांचक होऊ लागला आणि एकेकाळी या सामन्यात चायनीज तैपेईने आघाडी घेतली होती. मात्र अखेरच्या क्षणापर्यंतच्या या रोमहर्षक लढतीत भारताने पुन्हा आघाडी मिळवली आणि ती जाऊ दिली नाही आणि शेवटी सामना जिंकला.