मुंबई – भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. पेसवर त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन-पार्टनर रिया पिल्लईने २०१४ साली हे आरोप केले होते. त्या प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाने यावेळी रियाला दर महिन्याचे घर भाडे देण्याचा आदेशही दिला आहे. टेनिसमधून निवृत्त झालेल्या लिएंडर पेसने गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
टेनिसपटू लिएंडर पेस आणि अभिनेत्री-मॉडल रिया पिल्लई यांनी दीर्घ काळ एकमेकांना डेट केले. त्यानंतर ते जवळपास ८ वर्ष लिव्ह इनमध्ये होते. या काळात त्यांना मुलगी देखील झाली. तिचे नाव अकीरा आहे. रियाने २०१४ साली पेसवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत कोर्टामध्ये केस दाखल केली होती. पेसने आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तिने केली होती.
काय आहेत रिया पिल्लईचे आरोप
रिया पिल्लईच्या म्हणण्यानुसार, तीने पेससोबत जवळपास ८ वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यानंतर २०१४ मध्ये तिने लिएंडरवर गंभीर आरोप केले होते. लिएंडरने मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक शोषण केल्याचे रियाचे म्हणणे आहे. त्याच्या वर्तणुकीचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचेही रियाने म्हटले होते.
View this post on Instagram
लिएंडरने केले होते रियावर आरोप
रिया पिल्लई ही अभिनेता संजय दत्त यांची पूर्वश्रमीची पत्नी आहे. अशात लिएंडर पेसने रियावर, तिने अगोदरच विवाहित असल्याचे माझ्यापासून लपवले असा आरोप केला होता. लिएंडर पेस सध्या अभिनेत्री किम शर्मा हिला डेट करत आहे.