धक्कादायक बातमी, भारतीय संघ T20 विश्वचषकातून बाहेर!

WhatsApp Group

अबुधाबी – T20 विश्वचषकामध्ये आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. अफगाणिस्तानवर मिळवलेल्या दमदार विजयामुळे न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर अफगाणिस्तान आणि भारतीय संघ आयसीसी T20 विश्वचषक 2021 मधून बाहेर पडले आहेत.

अबुधाबी खेळलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 124 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने दिलेल्या 125 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने 19 व्या षटकामध्ये 2 विकेट गमावत विजय साजरा केला.


‘गट 2’ मधून न्यूझीलंड आणि पाकिस्तान सेमीफायनल खेळतील तर भारतासह ईतर 4 संघाचं आव्हान ‘सुपर 12’ फेरीतच संपुष्टात आले आहे. ‘गट 2’ मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.