
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला आणि भारतीय संघाने इतिहास रचला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. एका रोमांचक सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह टीम इंडियाने एक पदकही निश्चित केले आहे, जिथे संघ सुवर्ण किंवा किमान रौप्य पदक जिंकेल.
बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 164 धावा केल्या, ज्यात स्मृती मंधानाच्या 61 आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या 44 धावांचा समावेश होता. यानंतर यजमान 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा संघाला चांगली सुरुवात झाली.
India seal a nervy four-run win over England! #ENGvIND | #B2022 | 📝 https://t.co/hKqgbrJSoN pic.twitter.com/qnx7oPPSYu
— ICC (@ICC) August 6, 2022
मात्र नंतर भारतीय संघाने चांगले क्षेत्ररक्षण करत इंग्लंडच्या संघावर दबाव टाकला. यामुळेच इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 विकेट गमावून 160 धावा करू शकला आणि सामना 4 धावांनी गमावला. इंग्लंड संघाकडून कर्णधार नताली स्कायव्हरने 41 आणि डॅनियल व्याटने 35 धावा केल्या. सोफिया डंकलेने 19 धावांची खेळी खेळली. भारताकडून स्नेह राणाने 2 बळी घेतले, तर दीप्ती शर्माला एक यश मिळाले.
भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा संघ विकेटच्या शोधात होता तेव्हा इंग्लंडची विकेट रन आऊटच्या रुपात पडली. 6 पैकी 3 विकेट धावबाद म्हणून पडल्या. इंग्लंडच्या पराभवासाठी हे सर्वातमोठे कारण होते. आता भारतीय संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी भिडणार आहे, तर कांस्यपदकासाठी इंग्लंडचा संघ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या उपविजेत्या संघाशी भिडणार आहे.