IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कोणकोण आहे टीममध्ये?

0
WhatsApp Group

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात जुलै महिन्यात एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मालिका होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय वनडे आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी संघात अनेक नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय यष्टीरक्षक संजू सॅमसनला पुन्हा एकदा वनडे संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर कसोटी संघातही अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुकेश कुमारचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये बॅकअप म्हणून ठेवण्यात आले होते. याशिवाय नवदीप सैनीचेही संघात पुनरागमन होताना दिसत आहे. त्याचवेळी बीसीसीआयने मोठा निर्णय घेत चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादवला वगळले आहे. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यापासून बोर्ड या 2 खेळाडूंना वगळू शकते अशी चर्चा होती.

बीसीसीआयने निवडलेल्या वनडे संघात रोहित शर्माची कर्णधार आणि हार्दिक पांड्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसन आणि इशान किशनच्या रूपाने यष्टिरक्षक आहेत. या संघातील विशेष बाब म्हणजे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच कुलचा या जोडीला पुन्हा एकदा एकत्र खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार यांचा वेगवान गोलंदाजीत समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने आपला प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचा संघ

भारतीय एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर , अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

  • पहिला सामना – 12 ते 16 जुलै
  • दुसरा सामना – 20-24 जुलै

वनडे सीरिज

  • पहिला सामना – 27 जुलै
  • दुसरा सामना 29 जुलै
  • तिसरा सामना 1 ऑगस्ट

टी 20 सीरिज

  • पहिला सामना – 4 ऑगस्ट
  • दुसरा सामना – 6 ऑगस्ट
  • तिसरा सामना – 8 ऑगस्ट
  • चौथ्या सामना – 12 ऑगस्ट
  • पाचवा सामना – 13 ऑगस्ट.