मोठी बातमी! रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

WhatsApp Group

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील सर्वात मोठी आणि दुखद बातमी समोर आली आहे. रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय मृतक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कामध्ये आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून या वास्तव्यास असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तिथे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अतिशय भयानक परिस्थितीमध्ये विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत तिथे राहत आहेत.

संबंधित विद्यार्थी हा युक्रेनच्या खार्कीव्ह या शहरामध्ये वास्तव्यास होता. तिथे तो शिक्षणाच्या निमित्ताने गेला होता. खार्किव्ह हे युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. शहरामध्ये सध्या तणावपूर्वक वातावरण आहे. खार्किव्ह शहरात आज सकाळी गोळीबारादरम्यान भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक भारतीय विद्यार्थ्याचे शेखरप्पा असे नाव आहे. तो अवघ्या 21 वर्षांचा होता. तो सुपरमार्केट जवळ असतांना रशियन सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी मुळचा कर्नाटक राज्यातला आहे. तो खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे भारताला मोठा झटका बसला आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे आता भारतातही खळबळ उडाली आहे.