दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

WhatsApp Group

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. तो बराच काळ रुग्णालयात दाखल होता. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हा दुसरा भारतीय मृत्यू आहे. याआधी मंगळवारी कर्नाटकातील नवीन शेखरप्पा ग्यानगौदार या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किव येथे नवीनचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते. भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

युक्रेनमध्ये मृत्यू झालेला पहिला भारतीय विद्यार्थी शेखरप्पा हा 21 वर्षांचा होता. तो सुपरमार्केट जवळ असतांना रशियन सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी मुळचा कर्नाटक राज्यातला आहे. तो खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. या दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यूमुळे भारताला मोठा झटका बसला आहे. देशासाठी ही चिंतेची बाब आहे.