Indian Premier League 2025: क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल २०२५चे सामने

WhatsApp Group

Indian Premier League 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मार्चमध्ये सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी ही माहिती दिली.

बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन कुठे होणार, हे देखील निश्चित करण्यात आलं आहे. त्याबाबतही लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असं शुक्ला यांनी सांगितलं. याआधी 14 मार्चपासून 18 व्या हंगामाला सुरुवात होईल, असं इसपीएन क्रिकेइन्फोने दिलेल्या वृत्तात म्हटलं होतं. मात्र आता शुक्ला यांनी तारीख सांगितली असल्याने अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात झाला आहे.

यावेळी आयपीएल 2025 च्या आधी मेगा लिलाव झाला. या दरम्यान, ऋषभ पंत आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. त्याला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी केले.

त्याच वेळी, कोलकाता नाईट रायडर्सना आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. या काळात तो लीगच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. व्यंकटेश अय्यरला केकेआरने 23.75 कोटी रुपयांना खरेदी केले. अशाप्रकारे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू बनला.

राजीव शुक्ला म्हणाले की, पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या निवडीबाबतची बैठक 18 किंवा 19 जानेवारी रोजी होईल. आतापर्यंत इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश या तीन संघांनी या स्पर्धेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत.