IND vs SA: भारतीय खेळाडूंनी केला जबरदस्त डान्स,आफ्रिकेविरूद्धच्या विजयानंतर जल्लोष

WhatsApp Group

IND vs SA 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 8 विकेटने जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. विजयानंतर सर्व भारतीय खेळाडू एका गाण्यावर थिरकताना दिसले. याचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होतं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

या सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि संघ 99 धावांत गारद झाला. अशा प्रकारे भारताला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी 100 धावा करायच्या होत्या. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने 34 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शिखर धवनची 8 धावा करत लवकर विकेट गमावली. शिखर धवन धावबाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या इशान किशनलाही मोठी खेळी करता आली नाही तो 10 धावा करत तंबूत परतला. मात्र दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली. शुभमन गिलने श्रेयस अय्यरसोबत 39 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. शुभमन गिलचे अर्धशतक हुकले आणि तो 49 धावांवर बाद झाला. भारतीय संघाने 19.1 षटकात सामना जिंकला. श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 28 आणि संजू सॅमसनने दोन धावा केल्या.