
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला, ज्यामध्ये सिकंदर रझा (115) च्या शतकानंतरही भारताने 13 धावांनी हा सामना जिंकला. भारतीय क्रिकेट संघाने झिम्बावे विरूद्ध 3-0 अशी मालिका जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये सारे खेळाडू हा विजय साजरा करताना दिसले आहेत. उप कर्णधार Shikhar Dhawan ने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये टीम ‘काला चष्मा’ Team India’s ‘Kaala Chashma’ dance गाण्यावर थिरकताना दिसली आहे. शिखरसह ईशान किशन आणि शुभमन गिलच्या डान्स स्टेप्सनीं सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
या सामन्यात शुभमन गिलने भारतीय संघाकडून शतक झळकावले. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 8 गडी गमावून 289 धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलच्या 130, इशान किशनच्या 50, शिखर धवनच्या 40 आणि केएल राहुलच्या 30 धावांचा समावेश आहे. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझाने Sikandar Raza 95 चेंडूंत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 115 धावांची दमदार शचकी खेळी केली
त्याचवेळी झिम्बाब्वेचा संघ 290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र, पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या सिकंदर रझाने झिम्बाब्वेला विजयाच्या उंबरठ्यावर नेले, पण संघाला या विजयाची सीमा ओलांडता आली नाही. रझाने 115 आणि शॉन विल्यम्सने 45 धावा केल्या. याशिवाय एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि संघ 49.3 षटकांत 275 धावांत गुंडाळला गेला आणि सामना 13 धावांनी गमावला.