
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू (Indian Former Cricketer) आणि विकेटकीपर फलंदाज नमन ओझा (Naman ojha) याच्या वडिलांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. सव्वा कोटी रुपये हडपल्याच्या आरोपाखील त्यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेची सर्वत्र चर्चा होत आहे. शेतकऱ्यांच्या नावे खोटी किसान क्रेडिट कार्ड बनवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या आरोपाखाली त्यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाचा रिमांड सुनावला आहे.
२०१३ साली जौलखेडा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये अभिषेक रत्नन हे बँक मॅनेजर होते. त्यावेळी मॅनेजर अभिषेक रत्नन, विनय ओझा आणि अन्य काही आरोपींनी मिळून बनावट नाव आणि फोटोंच्या आधारे किसान क्रोडिट कार्ड बनवले. या कार्डच्या माध्यमातून त्यांनी बँकेतून पैसे मिळवले. बँकेतून पैसे काढल्यानंतर बँक मॅनेजर अभिषेक रत्नम, विनय ओझा, लेखपाल निलेश छलोत्रे, दीनानाथ राठोरसह अन्य आरोपींनी रक्कम आपसात वाटून घेतल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
या घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी अभिषेक रत्नम, विनय ओझा, निलेश छलोत्रे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० बी आणि आयटी कायदा कलम ६५,६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तत्कानिल बँक मॅनेजर अभिषेक रत्नम, निलेश छलोत्रे यांना आधीच अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार होते. सोमवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली.