भारतीय क्रिकेट संघानं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

WhatsApp Group

T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकून परतलेल्या भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. चॅम्पियन्स संघाचे खेळाडू पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी खेळाडूंशीही चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत फोटो काढले. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडूही वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा अनुभव शेअर करताना दिसले.

टीम मुंबईला रवाना 
आज संध्याकाळी 5 वाजता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या सुमारे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर रोड शोची जोरदार तयारी करण्यात आली आहे. संघ खुल्या बसमध्ये ट्रॉफीसह रोड शो करेल.