
भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. पाकिस्तानला आशिया कप 2023 चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली असून बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार आहे. मात्र, अंतिम निर्णय सरकारचा असेल. सरकारकडून मान्यता मिळाल्यास 2008 नंतर आता पुन्हा एकदा भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार 2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा पाकिस्तान दौरा निश्चितपणे तत्कालीन सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल, परंतु सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अजेंड्यावर नक्कीच आहे. पाकिस्तान 2023मध्ये 50 षटकांच्या आशिया चषकाचे यजमानपद भूषवणार आहे, त्यानंतर भारतात विश्वचषक होणार आहे. एजीएम नोटनुसार, बीसीसीआय पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहे.
राजकीय मुद्द्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बऱ्याच दिवसांपासून खेळली जात नाही. आता दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील हे निश्चित. आशिया चषकाभारत-पाकिस्तान संघ 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार
शिवाय आगामी काळात पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचेही यजमानपद भूषवणार आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे कारण काही महिन्यांत हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. आशिया चषक 2022 मध्ये दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ 2022 च्या T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी या मेगा स्पर्धेत दोन्ही संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता, तर आशिया चषकातही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.