मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची नजर आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहे. पहिला सामना ४ मार्चला होणार आहे, पण त्याआधीच रोहित शर्मा चर्चेत आला आहे.
मंगळवारी रोहित शर्माच्या ट्विटर अकाउंटवरून असे काही ट्विट करण्यात आलेत की, चाहत्यांना त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले की काय अशी शंका येत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या या ट्वीट्सवर चाहत्यांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहिंनी तर रोहित शर्मा दारू पिऊन हे विचित्र ट्वीट्स करतोय असं म्हटंलय. त्याने
I love coin tosses…especially when they end up in my belly!
— Rohit Sharma (@ImRo45) March 1, 2022
Bzz….! Did you know? Buzzing beehives make for great boxing bags!
— Rohit Sharma (@ImRo45) March 1, 2022
Cricket balls are edible…right?
— Rohit Sharma (@ImRo45) March 1, 2022
Drunk Tweet by Ro
— ???????????????????????????? (@rituraj45_) March 1, 2022
रोहित शर्माचे हे ट्विट पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली. काही चाहत्यांनी लिहिले की, रोहित शर्मा आज वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जेव्हा रोहित शर्माने ट्विट केले होते, तेव्हा ट्विटर युजर्सने लिहिले होते की, विराट कोहलीला चिडवण्यासाठी असे ट्विट केले जात आहेत.
Let’s just say there are better appetising options. ????♂️???? https://t.co/5ORwN9kWnL
— Ashwin ???????? (@ashwinravi99) March 1, 2022
रविचंद्रन अश्विननेही रोहित शर्माच्या ट्विटला मजेशीर उत्तर दिले आहे. युझवेंद्र चहलनेही ट्विट करून लिहिले की भाऊ? काय चालले आहे, सगळं ठीक आहे ना?
Bhaiya? What’s happening, Sab theek hai na? https://t.co/yXDLithw6f
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) March 1, 2022