Viral Video: सीमेवर पहारा देताना फौजी स्वतःचा वाढदिवस विसरला! लेकीच्या एका व्हिडिओ कॉलने देश हळहळला; पाहा भावूक व्हिडिओ

WhatsApp Group

भारतीय लष्करातील जवान (Indian Army) सण-उत्सव असो वा कौटुंबिक सोहळे, प्रत्येक वेळी स्वतःचा आनंद बाजूला ठेवून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जवानाचा १७ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने लाखो नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. आपल्या कर्तव्याच्या ओघात हा फौजी चक्क स्वतःचा वाढदिवस विसरला होता, मात्र जेव्हा त्याच्या लाडक्या लेकीचा फोन आला, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलली.

मध्यरात्री वाजली फोनची बेल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जवान रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीत आणि अंधारात आपली ड्युटी करत असल्याचे दिसते. रात्रीचे १२ वाजतात आणि त्याच्या मोबाईलवर मुलीचा व्हिडिओ कॉल येतो. पलीकडून जेव्हा मुलगी “हॅप्पी बर्थडे पापा” म्हणते, तेव्हा सुरुवातीला हा जवान चक्रावून जातो. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मितहास्य येते आणि आपल्याला आपलाच वाढदिवस लक्षात नाही, याचे त्याला आश्चर्य वाटते. हा क्षण इतका भावूक आहे की, तो पाहताना कोणाचेही मन भरून येईल.

सोशल मीडियावर भावनांचा पूर

हा व्हिडिओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर @SuvarnBharat नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १ लाख ८३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आपल्या सैनिकांच्या बलिदानाची आणि समर्पणाची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड होत आहे.

नेटकऱ्यांकडून सलाम

व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी भारतीय लष्कराप्रती आपला आदर व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले, “या महान रक्षकाला कोटी कोटी नमन.” दुसऱ्या एका युजरने म्हटले, “भारतीय सैन्यामुळेच आपण आपल्या घरात शांततेची झोप घेऊ शकतो, आम्हाला अभिमान आहे.” तर काहींनी म्हटले की, “एका सैनिकासाठी त्याचे कुटुंब देशच असतो, हे या व्हिडिओवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.”

व्हिडिओसाठी येथे क्लिक करा