आर्मी डे: व्हिडिओ शेअर करत भारतीय सैन्याने दाखवली आपली ताकद, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारतीय लष्कर म्हणजेच आपली भारतीय सेना आज ७४ वा आर्मी डे (Army Day) साजरा करत आहे. संपूर्ण देशाने आपल्या सैन्याचे यावेळी अभिनंदन केले आणि त्यांच्या जल्लोषात सहभाग घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दिनानिमित्त लष्कराला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सैन्याने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही भारतीय सैन्याचा अभिमान वाटेल.

आज संपूर्ण देश लष्करासह ७४ वा सेना दिन साजरा करत आहे. या दिवशी भारतीय सैनिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘शूर सैनिक त्यांच्या कुटुंबियांना लष्कर दिनाच्या शुभेच्छा. भारतीय लष्कर आपल्या शौर्यासाठी ओळखले जाते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारतीय लष्कराच्या अमूल्य योगदानाला आमचे शब्द न्याय देऊ शकत नाहीत.’

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ट्विट करून भारतीय लष्कराला लष्कर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी लिहिले, ‘सैनिक आणि माजी सैनिकांना लष्कर दिनाच्या शुभेच्छा. राष्ट्रीय सुरक्षेची खात्री करण्यासाठी भारतीय लष्कराची भूमिका महत्त्वाची आहे. आमच्या सैनिकांनी सीमेचे रक्षण आणि शांतता राखण्यात त्याग आणि शौर्य दाखवले आहे. तुमच्या सेवेबद्दल देश कृतज्ञ आहे. जय हिंद!’


लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी शनिवारी सकाळी ‘लष्कर दिना’निमित्त दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली. यानंतर करिअप्पा परेड मैदानावर परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी करिअप्पा परेड मैदानावरील परेडची पाहणी केली. लष्कराने परेडचा व्हिडिओही शेअर केला आहे.

१५ जानेवारीलाच ‘आर्मी डे’ साजरा का केला जातो?

१५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो कारण या दिवशी १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्य ब्रिटीश सैन्यापासून पूर्णपणे मुक्त झाले होते. त्यानंतर, प्रथमच लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा हे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ बनले. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख होते.

 

अधिक बातम्या वाचा 

धक्कादायक बातमी: दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू

पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

24 तासांत भारतात आढळले 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण, तर एवढ्या लोकांचा झाला मृत्यू