Agniveer Recruitment : 8वी पास असाल तरीही करू शकता अर्ज, 5 ग्रेड्सवर होणार भरती

WhatsApp Group

भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराने अग्निवीर रिक्रूटमेंट रॅली नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असणार आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. जुलै 2022 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

या पदांसाठी होणार भरती 

  • अग्निवीर जनरल ड्यूटी
  • अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/एम्‍यूनेशन)
  • अग्निवीर क्‍लर्क/ स्‍टोअरकीपर टेक्निकल
  • अग्निवीर ट्रेड्समन 10वी पास
  • अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास

पात्रता

  • जनरल ड्यूटी पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 10व्या वर्गात किमान 45 टक्के मार्क असणे आवश्यक असणार आहे.
  • टेक्निकल एव्हिएशन आणि एम्‍यूनेशन पदासाठी फिजिक्‍स, केमेस्‍ट्री, मॅथ्‍स आणि इंग्रजी विषयांत किमान 50 टक्के मार्कांसह 12वी पास होणे आवश्यक आहे.
  • क्‍लर्क/ स्‍टोअरकीपर पदांसाठी उमेदवार कुठल्याही शाखेतून किमान 60 टक्के मार्क घेऊन 12वी पास होणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी आणि मॅथ्‍स मध्ये 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
  • ट्रेड्समन पदांसाठी 10वी आणि 8वी पास उमेदवारांची वेग-वेगळी भरती घेण्यात येईल. सर्व विषयांत 33 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
  • सर्व पदांसाठी निर्धारित वयोमर्यादा 17.5 वर्ष ते 23 वर्ष एवढी असणार आहे.