India World Cup Squad : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असा आहे संपूर्ण संघ
विश्वचषक 2023 ची तारीख जवळ येत आहे. क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा आणि रंगारंग कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, BCCI ने वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार सर्व संघांना स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिना आधी संघाची घोषणा करावी लागते. आज त्याची शेवटची तारीख आहे. यावेळच्या विश्वचषकाबद्दल बोलताना बीसीसीआयच्या निवड समितीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. आशिया चषक 2023 मध्ये जसा दिसत आहे तसाच संघ दिसत आहे. मात्र, 28 सप्टेंबरपर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात. India World Cup Squad Announced 2023
The squad is ready🔥pic.twitter.com/OzrKbNtCSw
— CricTracker (@Cricketracker) September 5, 2023
विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल