IND vs ENG 2nd T20: तिलक वर्माच्या शानदार खेळीनं भारताचा विजय, मालिकेत 2-0 ने आघाडी

WhatsApp Group

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज चेन्नईमध्ये खेळला गेला. इंग्लंडने २० षटकांत ९ विकेट गमावून १६५ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून बटलरने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याच वेळी, भारताकडून अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताला जिंकण्यासाठी १६६ धावा करायच्या होत्या. तिलक वर्माच्या शानदार खेळीनं भारतानं हा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

तिलक वर्मा
या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो तिलक वर्मा होता. त्याने ५५ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या सामन्यात त्याने इंग्लंडच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. आपल्या खेळीदरम्यान, तिलक वर्माने सुंदर, बिश्नोई आणि अर्शदीपसोबत महत्त्वाच्या भागीदारी केल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

भारताने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले होते. वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळाली होती. भारताने पहिला टी20 सामना 7 गडी राखून जिंकला होता. तसेच पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत २-0 ने आघाडी घेतली होती.

बटलर इंग्लंडसाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला
जोस बटलर इंग्लंडकडून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे, तर सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो जगातील चौथा खेळाडू बनला आहे. बटलर १५१ षटकारांसह टी-२० स्वरूपात इंग्लंडसाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
२०५ – रोहित शर्मा
१७३ – मार्टिन गुप्टिल
१५८ – मुहम्मद वसीम
१५१ – जोस बटलर
१४९ – निकोलस पूरन
१४५ – सूर्यकुमार यादव

टीम इंडियाच्या या रोमांचक विजयात उपकर्णधार अक्षर पटेलनेही महत्त्वाचे योगदान दिले. त्याने बटलरला बाद केले. या सामन्यात बटलर ४५ धावा करून बाद झाला. याशिवाय, त्याने धोकादायक लिव्हिंगस्टोनला बाद केले. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.