भारताची रो’हिट’ कामगिरी, भारताचा वेस्ट इंडिजला 3-0 ने ‘व्हाइटवॉश’

WhatsApp Group

अहमदाबाद – भारत आणि वेस्ट India vs West Indies इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या वनडे सामन्यात 96 धावांनी विजय मिळवत India won by 96 runs भारताने 3 सामन्यांची ही वनडे मालिका 3-0 ने जिंकत वेस्ट इंडिजला 3-0 ने ‘व्हाइटवॉश’ दिला आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन हे दिग्गज फलंदाज काहीच कमाल दाखवू शकले नाही.


चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या श्रेयस अय्यरने 80 धावांची अर्धशतकी खेळी केली तर ऋषभ पंतनेही श्रेयसला चांगली साथ देत 56 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने 33 तर दीपत चहारने 38 धावा केल्या. या चौघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 265 धावांपर्यंत मजल मारली.

या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ  सर्वबाद 169 धावा करू शकला. वेस्ट इंडिजसाठी ओडेन स्मिथने सर्वाधिक 36 धावा केल्या तर कर्णधार निकोलस पुरनने 34 धावा केल्या.

या सामन्यात श्रेयस अय्यरने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा

विश्वविजेता कर्णधार यश धुल खेळणार रणजी ट्रॉफी, या संघात मिळाले स्थान!

ना धोनी, ना रोहित ना कोहली…IPL च्या इतिहासात ‘या’ खेळाडूवर लागली होती पहिली बोली