भारताच्या विजयाचे ‘श्रेय’ अय्यरला, टी२० मालिकेत भारताने श्रीलंकेला दिला ‘क्लीन स्वीप’

WhatsApp Group

धर्मशाला : टीम इंडियाने शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव केला India vs Sri Lanka, 3rd T20I. यासह भारतीय संघाने ही टी२० मालिका ३-० अशी खिशात घातली. तिसऱ्या टी-२० मध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १४६ धावा केल्या.

श्रेयस अय्यर पुन्हा चमकला : तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताच्या या विजयाचा हिरोही श्रेयस अय्यर होता. श्रेयस अय्यरने ७३ धावांची नाबाद खेळी खेळली. तत्पूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकात दुष्मंता चमीराने रोहित शर्माला ५ धावांवर बाद केले. संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी २८ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली. यानंतर सॅमसन १८ धावा करून बाद झाला. दीपक हुडानेही विजयात २१ धावांचे योगदान दिले.


भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी : मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. शेवटच्या सामन्यात मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना संधी मिळाली, ज्याचा दोन्ही खेळाडूंनी पुरेपूर फायदा घेतला. सिराजने ४ षटकात २२ धावा देत १ बळी घेतला. आवेशने ४ षटकात २३ धावा देत २ बळी आपल्या नावावर केले. हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी १-१ विकेट घेतली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने सर्वाधिक धावा केल्या. शनाकाने ७४ धावांची खेळी खेळली.