Kho kho world cup 2025: खो खो विश्वचषक २०२५ मध्ये, भारतीय महिला संघाने तिसऱ्या सामन्यात मलेशियाचा १००-२० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला संघानंतर आता महिला संघानेही सलग तिसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या मुलींनी आक्रमण आणि बचावात उत्कृष्ट कामगिरी केली. प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मागील दोन सामन्यांप्रमाणेच तिसऱ्या सामन्यातही तीच लय कायम ठेवली.
भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत. आता भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेतील कामगिरी पाहता जेतेपदापासून रोखणं कठीण आहे असंच दिसत आहे. आता बाद फेरीत भारताने अशीच कामगिरी ही अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.