Commonwealth Games 2022साठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर, हरमनप्रीत कौर कर्णधार

WhatsApp Group

BCCI ने सोमवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौरची भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. विश्वचषकानंतर भारतीय महिला संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल.

भारताला या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसह अ गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघाचा समावेश आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाला आपला पहिला सामना 29 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध, दुसरा सामना 31 जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि तिसरा सामना 3 ऑगस्ट रोजी बार्बाडोसविरुद्ध खेळायचा आहे. भारताचे तिन्ही सामने एजबॅस्टन आणि बर्मिंगहॅम येथे होणार आहेत. पहिला आणि दुसरा उपांत्य सामना 6 ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर कांस्यपदकाची लढत 7 ऑगस्टला होणार आहे. अंतिम सामनाही 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ पुढीलप्रमाणे 

  • हरमनप्रीत कौर – कर्णधार 
  • स्मृति मंधाना  – उपकर्णधार
  • शैफाली वर्मा
  • सबभिननि मेघना
  • तानिया सपना भाटिया – विकेट कीपर
  • यास्तिका भाटिया  – विकेट कीपर
  • दीप्ति शर्मा
  • राजेश्वरी गायकवाड़
  • पूजा वस्त्राकार
  • मेघना सिंह
  • रेणुका ठाकुर
  • जेमिमा रोड्रिगुएस
  • राधा यादव
  • हरलीन देओल
  • स्नेह राणा

स्टँडबाय खेळाडू 

  • सिमरन दिल बहादूर
  • रिचा घोष
  • पूनम यादव