महिला विश्वचषक: भारताला पराभवाचा धक्का! ऑस्ट्रेलिया सेमीफायनल खेळणार!

WhatsApp Group

महिला विश्वचषकाच्या १८ व्या सामन्यात भारतीय India संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध Australia प्रथम फलंदाजी करताना मिताली, यास्तिका आणि हरमनप्रीत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ७ बाद २७७ पर्यंत मजल मारत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २७८ धावांचं आव्हान दिलं होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने दमदार फलंदाजी करत ६ विकेट्स राखून विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाचा संघ १० गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आतापर्यत ऑस्ट्रेलियाने ५ सामने खेळले असून हे पाचही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आपले सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केले आहे.

भारताकडून प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना (१०) आणि शफाली वर्मा (१२) स्वस्तात बाद झाल्या. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद २८ अशी झाली होती. मात्र त्यानंतर यास्तिका भाटिया आणि मिताली राज या जोडीने संघाला चांगली दिशा दिली. यास्तिका आणि मितालीने १३० धावांची भागीदारी केली. भारतासाठी यास्तिकाने ५९, हरमनप्रीतने ५७ आणि मितालीने  ६८ धावा केल्या.


या पराभवामुळे भारतीय संघ आयसीसी महिला विश्वचषकाच्या ICC Womens World Cup गुणतालिकेत चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. या यादीत पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर तिसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा संघ आहे.