भारत आणि इंग्लंड यांच्यातील ICC अंडर-19 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे India win ICC U19 World Cup 2022 .
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारताने 189 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 190 धावांचे लक्ष्य 47.5 षटकांत 4 गडी शिल्लक असतानात पूर्ण करत भारताने शानदार विजय मिळवला. भारतीय संघाचे हे पाचवे U19 विश्वचषक विजेतेपद ठरले आहे.
???????????????????? ????19 ???????????? ???????????? #????19???????????? 2022 ????????????????????????????????????! ???? ????
A fantastic performance by #BoysInBlue as they beat England U19 by 4⃣ wickets in the Final! ???? ???? #INDvENG
This is India’s FIFTH Under 19 World Cup triumph. ???? ????
Scorecard ▶️ https://t.co/p6jf1AXpsy pic.twitter.com/bQzABDFUpd
— BCCI (@BCCI) February 5, 2022
खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात इंग्लंडचा कर्णधार टॉम पर्स्टने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लिश कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला नाही, कारण इंग्लंडचा निम्मा संघ 13 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, मधल्या षटकांमध्ये संघाने बऱ्यापैकी फलंदाजी करत 44.5 षटकांत सर्वबाद 189 धावा केल्या.
इंग्लंडने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून निशांत सिंधू Nishant Sindhu आणि शेख रशीद Shaik Rasheed यांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 47.5 षटकांत 6 गडी गमावून 190 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि हा सामना 4 गडी राखून आपल्या नावावर केला.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जोशुआ बायडेन, जेम्स सेल्स आणि थॉमस ऍस्पिनवॉल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.