आज अफगाणिस्तान हरल्यास भारत विश्वचषकातून होणार बाहेर!
अबुधाबी – T20 विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज न्यूझीलंडला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अबुधाबी येथे होणाऱ्या या सामन्यावर करोडो भारतीय चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल, तर मोहम्मद नबी अफगाण संघाचे नेतृत्व करेल.
अबुधाबी होणार हा सामना अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसह भारतासाठीही खुप महत्वाचा सामना आहे. कारण या सामन्याच्या निकालावर ‘गट 2’ मधून आयसीसी T20 विश्वचषक 2021 च्या सेमीफायनलमध्ये जाणारा दुसरा संघ मिळणार आहे. या गटातून पाकिस्तानच्या संघाने आपले पहिले 4 सामने जिंकून 8 गुणांसह यापूर्वीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
या सामन्यात जर न्यूझीलंडने अफगाणिस्तान पराभव केला तर अफगाणिस्तान आणि भारत हे दोन्ही संघ विश्वचषकातून बाहेर होणार आहेत. तर ‘गट 2’ मधून न्यूझीलंड आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचतील.
अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडचा पराभव केला तर भारताकडे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची मोठी संधी असेल. अफगाणिस्तान जिंकल्यास भारतीय संघाचे सेमीफायनल खेळण्याचे दरवाजे उघडतील. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयामुळे अफगाणिस्तानचे सहा गुण होतील, ज्यामुळे ते न्यूझीलंडशी बरोबरी साधतील. तसेच न्यूझीलंडचा संघही अफगाणिस्तानच्या तुलनेत खराब नेट रनरेटमुळे स्पर्धेतून बाहेर पडेल .
Whom are you backing to win?????#NewZealand #Afghanistan #T20WorldCup #NZvsAFG #ViratKohli #KaneWilliamson #MohammadNabi #RashidKhan pic.twitter.com/hXQtCLHP5d
— CricTracker (@Cricketracker) November 7, 2021
न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतरही अफगाणिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार नाही. अफगाणिस्तानसाठी ‘नेट रन रेट’ महत्त्वाचा ठरणार असून त्यांची नजर सोमवारी भारताच्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यावर असेल. भारत त्या सामन्यात विशेष रणनीती घेऊन मैदानात उतरेल, जेणेकरून निव्वळ ‘नेट रन रेट’ जोरावर भारत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला मागे टाकू शकेल. ‘गट 2’ मध्ये सध्या भारताचा ‘नेट रन रेट’ सर्वात जास्त आहे.
अफगाणिस्तानच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ ताकदवान आणि अनुभवी आहे, त्यामुळे न्यूझीलंड अफगाणिस्तानला हरवून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करू शकते, कारण या विजयामुळे त्यांचे 8 गुण होतील. मात्र न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारत आणि अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर होतील.