चिंताजनक बातमी, डोक्याला चेंडू लागल्याने इशान किशन हॉस्पिटलमध्ये दाखल

WhatsApp Group

टीम इंडियाने धर्मशाला येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये श्रीलंकेवर India vs Sri Lanka ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतरही भारतीय टीमला काळजीत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. काल सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने टीम इंडियाचा ओपनर इशान किशनला Ishan Kishan हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दुसऱ्या टी२० सामनादरम्यान श्रीलंकेचा फास्ट बॉलर लाहिरू कुमार याचा बाऊन्सर इशानच्या डोक्याला लागला होता. टीम इंडियाच्या इनिंगमधील चौथ्या ओव्हरमध्ये इशानच्या डोक्याला लागला बॉल लागला होता. त्या ओव्हरमधील दुसरा बॉल कुमारने १४६ किमी प्रती तास वेगाने टाकला होता. तो इशानच्या डोक्याला लागला. त्यानंतर ईशान किशन काही काळ हेल्मेट काढून मैदानातच बसला होता. टीम इंडियाच्या फिजियोने मैदानात येऊन त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर इशानने काही काळ बॅटींग केली. मात्र तो फार प्रभाव टाकू शकला नाही. १५ बॉलमध्ये १६ रन काढून तो बाद झाला.


इशानला खबरदारीचा उपाय म्हणून त्याला कांगडामधील हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. स्कॅन झाल्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. इशान दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये फार प्रभाव टाकला नसला तरी पहिल्या टी-२० मध्ये आक्रमक अर्धशतक झळकावले होते. तो या सीरिजमध्ये रोहितसोबत ओपनिंग करत आहे. आज (रविवारी) होणाऱ्या सामन्यामध्ये इशान किशन खेळला नाही तर त्याच्या जागेवर मयांक अग्रवालचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.