भारताची दमदार कामगिरी, वनडेपाठोपाठ टी२० मालिकेतही वेस्ट इंडिजला दिला ‘क्लीन स्वीप’
कोलकाता – भारत आणि वेस्ट India vs West Indies इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात १७ धावांनी विजय मिळवत India won by 17 runs भारताने ३ सामन्यांची ही टी२० मालिका ३-० ने जिंकत वेस्ट इंडिजला ‘क्लीन स्वीप’ दिला आहे.
तिसऱ्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८४ धावा केल्या होत्या. भारतासाठी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. त्याने ३१ चेंडू खेळताना ७ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ही अर्धशतकी केली. तर इशान किशनने ३४ आणि व्यंकटेश अय्यरने नाबाद ३५ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर भारताने निर्धारीत २० षटकांमध्ये ५ विकेट्स गमावत १८४ धावांपर्यंत मजल मारली.
भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ९ विकेट्स गमावत १६७ धावा करू शकला. वेस्ट इंडिजसाठी निकोलस पुरणने ६१ सर्वाधिक धावा केल्या. या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.