भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारी 2022 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर दुसरी वनडे जिंकून मालिकेवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असेल. दुसऱ्या वनडे सामन्यात उपकर्णधार केएल राहुलने पुनरागमन केले असून आहे.
हिजाबवरून वाद वाढला; कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज होणार सुनावणी
KL Rahul ???? Ishan Kishan
Odean Smith ???? Kieron PollardThe series is on the line in Ahmedabad – who is winning this? ???? https://t.co/gwoCgXllaT | #INDvWI pic.twitter.com/9q39v6hxqS
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 9, 2022
पहिल्या सामन्यातील पराभव विसरून वेस्ट इंडिजच्या नजरा अधिक चांगल्या कामगिरीवर असतील. गेल्या 16 सामन्यांमधील 10 सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. पहिल्या सामन्यादरम्यान कायरन पोलार्ड दुखापतग्रस्त झाल्याने या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार हा निकोलस पूरन आहे.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग XI
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडिज – निकोलस पूरन, (कर्णधार), ओडेन स्मिथ डन किंग, शाई होप, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, केमार रोच.
पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत