IND VS WI : दुसऱ्या वनडेत भारताचा दमदार विजय, मालिकेत 2-0 ने घेतली विजयी आघाडी

WhatsApp Group

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या वनडेत 44 धावांनी विजय मिळवत India won by 44 runs भारताने 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली, तर माजी कर्णधार विराट कोहलीही काही कमाल दाखवू शकला नाही.


भारतासाठी सूर्यकुमार यादवने 64 धावांची अर्धशतकी खेळी केली तर उपकर्णधार केएल राहुलने 49 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 9 बाद 237 धावांपर्यंत मजल मारली.

भारताने विजयासाठी दिलेल्या 238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 46 षटकात सर्वबाद 193 धावा करू शकला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स पटकावेलत. तर शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतलेत.

या मालिकेतील पहिला सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला होता. मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना 11 फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे.

हेही वाचा 

IPL २०२२ मध्ये हार्दिक पांड्याचा अहमदाबाद संघ ‘या’ नावाने मैदानात उतरणार

आयपीएलची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी होणार मेगा ऑक्शन!