कोलकाता – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात India vs West Indies 1st T20I भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या या टी२० सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
खेळल्या गेलेल्या या पहिल्या टी२० सामन्यात सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजच्या संघाने निर्धारीत २० षटकात ७ बाद १५७ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजसाठी निकोलस पूरनने Nicholas Pooran सर्वाधिक ६१ धावा केल्या. त्याने ४३ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडून पदार्पणवीर रवी बिश्नोईने Ravi Bishnoi २ तर हर्षल पटेलने Harshal Patel २ विकेट्स घेतले.
There was a bit of tension in the middle overs; but the Indian innings started and ended well to get them a 1-0 lead in the T20I series#INDvWI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 16, 2022
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma सर्वाधिक ४० धावा केल्या त्याखालोखाल ईशान किशनने ३५ धावा केल्या. या सामन्यात पदार्पणवीर रवी बिश्नोईने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.