Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडियासाठी आज करो या मरोचा सामना…

WhatsApp Group

Asia Cup 2022 : टीम इंडियाला आज आशिया कप 2022 च्या सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा सामना करावा लागणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. भारतीय संघ हा सामना हरला तर स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल, तर हा सामना जिंकल्यास संघ अंतिम फेरी गाठण्याच्या जवळ जाईल. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर 4 मधील तिसरा सामना आज म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. श्रीलंका संघाने पहिला सामना जिंकला आहे. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. अशा स्थितीत हा सामना रंजक असेल, जिथे श्रीलंकेच्या संघाचे मनोबल सातव्या गगनाला भिडले असेल, तर भारतीय संघाला थोडे दडपण जाणवू शकते.

भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक 2022मध्ये विजयाने सुरुवात केली. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता, तर साखळी टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव झाला होता. मात्र, सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल ही भारतासाठी सर्वात मोठी चिंता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात.

पाकिस्तानविरुद्ध भारतीय क्रिकेट संघात तीन बदल करण्यात आले होते. दीपक हुडा, रवी बिश्नोई आणि हार्दिक पांड्याला संधी मिळाली होती, तर दिनेश कार्तिक, आवेश खान आणि रवींद्र जडेजा यांना वगळण्यात आले. पाकिस्तानविरुद्धची कामगिरी पाहता संघात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळू शकते.