बंगळुरू – भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा India vs Sri Lanka 2nd Test आणि शेवटचा सामना हा पिंक बॉल pink ball test टेस्ट म्हणजेच डे-नाईट स्वरूपाचा असणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघ सध्या १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना निर्णायक असेल.
1. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरी कसोटी कोठे होणार आहे?
हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
2. सामना कधी आणि किती वाजता सुरू होईल?
हा सामना 12 मार्च रोजी होणार आहे. दिवस-रात्र असल्याने हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल.
3. कोणत्या चॅनलवर सामना थेट प्रक्षेपित केला जाईल?
स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी या वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तर डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे थेट ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहता येईल.
बंगळुरू कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (डब्ल्यूके), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)