जडेजासमोर श्रीलंकेने पत्करली शरणागती, तीन दिवसात भारताने लावला कसोटीचा निकाल

WhatsApp Group

मोहाली – श्रीलंकेवीरुद्धच्या टी२० मालिकेतील दमदार यशानंतर भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेतही दमदार सुरुवात केली. मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला. घरच्या भूमीवर जवळपास अजिंक्य ठरलेल्या भारतीय संघासमोर श्रीलंकेचा संघ दीड दिवसही टिकू शकला नाही. भारताने श्रीलंकेवीरुद्धची ही पहिली कसोटी कसोटी एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली India won by an innings and 222 runs.

या दमदार विजयासह भारतीय संघाने माजी कर्णधार विराट कोहलीला त्याच्या १००व्या कसोटीत विजयाची भेटही दिली. भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली. त्याच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ टिकू शकला आहे.

रवींद्र जडेजासमोर श्रीलंकेने पत्करली शरणागती – रवींद्र जडेजाने भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. भारतासाठी नाबाद १७५ धावांच्या खेळीनंतर अष्टपैलू जडेजाने गोलंदाजीतही अविश्वसनीय कामगिरी केली. नाबाद १७५ धावा आणि ९ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा या विजयाचा नायक ठरला. रवींद्र जडेजाने श्रीलंकेच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना ५ विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात ४ विकेट आपल्या नावावर केल्या.


रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी रविवारी श्रीलंकेच्या १६ विकेट्स घेतल्या, तर श्रीलंकेच्या फलंदाजांना २५० धावाही करता आल्या नाहीत. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले, तर निरोशन डिकवेलाने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.