श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा ६२ धावांनी दणदणीत विजय!

WhatsApp Group

लखनऊ – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या दमदार कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही विजयी सुरुवात केली आहे. भारताने गुरुवारी २४ फेब्रुवारीला लखनऊ येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या India vs Sri Lanka पहिल्या टी-२० सामन्यात ६२ धावांनी मोठा विजय India won by 62 runs नोंदवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडियाने सलग १० वा टी-२० सामना जिंकला आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघाने पुढील तीन सामने जिंकले. त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण ६ सामने जिंकले.

हा सामना टीम इंडियाच्या त्या खेळाडूंसाठी आपली क्षमता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ ठरला, ज्यांचे अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित नाही. या सामन्यात सलामीवीर इशान किशन, श्रेयस अय्यर, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल यांनी दमदार कामगिरी करत निवडकर्त्यांसमोर आपली दावेदारी मजबूत केली आहे. या सामन्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी साकारली.


भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या खराब मालिकेतून सावरलेल्या इशानने धमाकेदार सुरुवात केली आहे. इशानने अवघ्या 30 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. इशानने रोहितसोबत १११ धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये रोहितने ४४ धावांचे योगदान दिले. भारतासाठी सलामी फलंदाज इशान किशन (८९) आणि श्रेयस अय्यर (५७) तर रोहित शर्माने (४४) धावांची खेळी केली.

भारताने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ६ विकेट्स गमावत १३७  धावा करू शकला. भारतासाठी भुवनेश्वर कुमारने २, व्यंकटेश अय्यरने २ तर रवींद्र जडेजा आणि यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.