अवघ्या ३९ चेंडूत भारताने स्कॉटलंडवर मिळवला विजय…

WhatsApp Group

दुबई – भारत आणि स्कॉटलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या असल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी स्कॉटलंडची दाणादाण उडवली आहे. प्रथम फलंदाजी करणारा स्कॉटलंडचा संघ  फक्त ८५ धावांवर गारद झाला होता. स्कॉटलंडने दिलेल्या ८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने अवघ्या ३९ चेंडूत विजय मिळवला.

दुबईत आलं रोहित आणि राहुलचं वादळ

भारतासाठी रोहित आणि राहुलने धमाकेदार सुरुवात केली. राहुलने १९ चेंडूत ५० तर रोहितने १६ चेंडूत ३० धावा केल्या. या दोघांच्या वादळी खेळीच्या जोरवार भारताने स्कॉटलंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला आहे.

स्कॉटलंडचा संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर गारद!

स्कॉटलंडचा एकही फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. स्कॉटलंडकडून फलंदाजी करताना जॉर्ज मुन्सीने सर्वाधिक १९ चेंडूत २४ धावा तर मायकेल लीस्कने १२ चेंडूत २१ धावा केल्या.


भारतीय संघाची भेदक गोलंदाजी

भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ३.४ षटकात १० धावा देत २ विकेट्स, मोहम्मद शमी ३  षटकात १५ धावा देत ३ विकेट्स, रवींद्र जडेजाने ४ षटकात १५ धावा देत ३ विककेट्स तर रवीचंद्रन अश्विनने ४ षटकात २९ धावा देत १ विकेट घेतली.

या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीने या T20 विश्वचषकात नाणेफेक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.