छोट्या दिवाळीत किंग कोहलीचा मोठा धमाका, चित्तथरारक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर ४ विकेट्सने विजय

WhatsApp Group

T20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते India vs pakistan .  त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने 20 षटकांत 6 विकेट गमावून 160 धावा केल्या आणि सामना जिंकला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. राहुल आणि रोहित प्रत्येकी 4 धावा करून बाद झाले. कोहलीने शानदार अर्धशतकी भागीदारी केली. भारताने शेवटच्या षटकात 16 धावा देऊन सामना जिंकला.

अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने रविवारी टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आठ बाद १५९ धावांवर रोखले. अर्शदीपने चार षटकांत ३२ धावा देत तीन बळी घेतले. त्याने पहिल्या दोन षटकांतच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (0) आणि मोहम्मद रिझवान (4) यांना बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पांड्याने 30 धावांत तीन बळी घेतले.


पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने ५१ धावा केल्या आणि भारतीय गोलंदाजांसमोर तो पूर्णपणे आरामात दिसत होता. फिरकीपटू आर अश्विन आणि अक्षर पटेल संघर्ष करताना दिसले, त्यामुळे सहावा गोलंदाज पांड्याने चार षटके टाकली.

पाकिस्तान दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने 53 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 82 धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने त्याला चांगली साथ देत 37 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.