न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

WhatsApp Group

रांची – दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ७ विकेट राखत हा सामना जिंकला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या या मालिकेती भारताने २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे.  भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५५ धावा तर उपकर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक ६५ धावा केल्या.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला १६५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, मात्र रांचीमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात रोहित आणि राहुलच्या दमदार सलामीच्या जोरावर भारतीय संघाने १५४ धावांचे लक्ष्य सहजपणे गाठत ७ विकेट राखत सामना आपल्या नावावर केला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेल २ विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने २० षटकात ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने दमदार सुरवात करून दिली.

लोकेश राहुलने ४९ चेंडूत ६ चौकार आणि २  षटकरांसह ६५ धावा केल्या तर कर्णधार ३६ चेंडूत १ चौकार आणि ५  षटकरांच्या मदतीने ५५ धावा केल्या. पहिल्या विककेटसाठी दोघांनी ११७ धावांची भागिदारी केली. तर पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकवणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात अवघ्या १ धावावर बाद झाला. न्यूझीलंडसाठी त्यांचा कर्णधार साऊदीने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत ३ बळी टीपले.

प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची ही पहिलीच मालिका आहे. टी२० विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाला ही मालिका जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते.