IND vs NZ: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारताला विजयासाठी 9 विकेट्सची गरज

WhatsApp Group

कानपूर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात  कानपूर येथे सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या संघाने 1 बाद धावा केल्या आहेत. सामन्यात्या चौथ्या दिवशी श्रेयस अय्यरच्या 65 आणि ऋद्धिमन साहाच्या नाबाद 61 अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित करत न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान दिले.

धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूप खराब झाली. रविचंद्रन अश्विनने सलामीवीर विल यंगला 2 धावांवर बाद करत न्यूझीलंडला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. तत्पूर्वी, भारतीय संघाने आपला डाव 234 धावांवर डाव घोषित केला होता. तर न्यूझीलंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 296 धावा केल्या होत्या. सामन्याच्या अखेरच्या दिवशी आता भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.


भारतासाछी अय्यर आणि साहा यांच्याशिवाय रविचंद्रन अश्विनने 32 आणि अक्षर पटेलने नाबाद 28 धावा करत मोलाचे योगदान दिले. ऋद्धिमन साहा आणि अक्षर पटेल यांनी 8व्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी केली. भारताच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडसाठी टीम साऊथी आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट मिळवल्या तर एजाज पटेलने एक विकेट मिळवला.

हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी भारताला 9 विकेट्सची तर न्यूझीलंडच्या संघाला 280 धावांची गरज आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कोणत्याही विदेशी संघाने भारतीय भूमीवर 276 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. त्यामुळे हा सामना भारतीय संघच जिंकेल असा कल आहे. मात्र न्यूझीलंडच्या ताफ्यात केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्यासारखे अनुभवी आणि दिग्गज फलंदाज आहेत. त्यांनी चांगली फलंदाजी केल्यास या सामन्याचे चित्र ते नक्की पालटवू शकतात.