तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलने पटकावलेत ५ विकेटस, भारताकडे 63 धावांची आघाडी

WhatsApp Group

कानपूर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताची धावसंख्या 1 बाद 14 अशी आहे. मयंक अग्रवाल 4 तर चेतेश्वर पुजारा 9 धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ 296 धावांवर सर्वबाद झाल्याने आता भारताकडे 63 धावांची आघाडी आहे.


न्यूझीलंडचा डाव 296 धावांवर आटोपल्यावर दुसऱ्या डावात फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. काइल जेमिसनने दुसऱ्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. पहिल्या डावातही गिलला जेमिसनने तंबूचा रस्ता दाखवला होता. या विकेटसह जेमिसनने कसोटी क्रिकेटमधील आपलं 50 विकेटही पूर्ण केले आहेत. तो न्यूझीलंडचा 50 कसोटी विकेट घेणारा 37 वा गोलंदाज ठरला आगे.

या सामन्यात आर अश्विनने जेमिसनची विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा विक्रम अश्विनने मागे टाकला आहे. वसीम अक्रमच्या नावावर कसोटीत 414 तर अश्विनच्या नावावर आता 416 कसोटी विकेट्स आहेत.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुखापतीमुळे मैदानात आला नाही. त्याच्या जागी तिसऱ्या दिवशी भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतला भारतीय संघात पाचारण करण्यात आले.

कानपूर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडचे 5 फलंदाज माघारी धाडले. सौदीची विकेट घेण्यासोबतच अक्षरने पाचव्यांदा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच अक्षरने सलग सहाव्यांदा एका डावात 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. एवढेच नाही तर भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात एकाच डावात पाच विकेट घेणारा अक्षर पटेल हा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.


न्यूझीलंडसाठी 95 धावांची शानदार शानदार खेळी करणाऱ्या टॉम लॅथमचे शतक थोडक्यात हुकले. या सामन्यात्या दुसऱ्या दिवशी लॅथमला डीआरएसवर तीन वेळा जीवदान मिळाले आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळातही तो अश्विनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला, पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे तो नाबाद राहिला. मात्र चार वेळा जीवनदान मिळूनही तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही