India vs England: आर अश्विनची ‘ती’ चूक भोवली; बॅटिंगला न येताच इंग्लंड फ्री मिळाल्या 5 धावा

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान पहिल्याच दिवशी अनेक नवे विक्रम झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा त्यातही विक्रम होत होते. दरम्यान, असे काही घडले ज्याची कोणालाच अपेक्षा नसेल. भारतीय फलंदाज रविचंद्रन अश्विनला एक चूक महागात पडली.

आर अश्विन याच्या एकट्याच्या चुकीमुळे टीम इंडियाला फटका बसला आहे. अश्विनच्या एका चुकीमुळे इंग्लंडला मोठा फायदा झाला आहे. अश्विनमुळे टीम इंडियाच्या डावातच इंग्लंडचं खातं उघडलं आहे. आता इंग्लंडच्या बॅटिंगची सुरुवात ही 0 पासून न होता 5 धावांपासून होणार आहे. अश्विनकडून नक्की काय झालं? त्याआधी रवींद्र जडेजाने पहिल्या दिवशी काय गोंधळ घातला? हे सविस्तर जाणून घेऊयात.

आर अश्विन टीम इंडियाच्या डावातील 102 व्या ओव्हरमध्ये ही चूक केली. ज्यामुळे टीम इंडियाला 5 धावांचा तोटा सहन करावा लागला. इंग्लंडकडून रेहान अहमद हा 102 वी ओव्हर टाकायला आला. रेहानच्या या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अश्विनने सिंगल घेण्यासाठी धावला. या दरम्यान अश्विनने चूक केली. अश्विन पीचच्या मधल्या भागातून (स्टंप्सच्या रांगेतून) धावायला लागला.

नियमांनुसार, स्टंपच्या रांगेतून धावता येत नाही. त्यामुळे खेळपट्टीचं नुकसान होतं. पहिल्या दिवशी रवींद्र जडेजानेही अशीच चूक केली होती. मात्र अंपायरने जडेजाला याबाबत ताकीद दिली होती. त्यानंतर अश्विनकडून पुन्हा अशीच चूक झाल्याने अंपायरने 5 धावांची पेन्लटी लावली. त्यामुळे अंपायर जोएल विल्सन याने टीम इंडियाला 5 धावांचा दंड ठोठावला. त्यामुळे आता इंग्लंडच्या बॅटिंगची सुरुवात ही 5 धावांपासून होईल.

दरम्यान टीम इंडियाची दुसऱ्या दिवशी निराशाजनक सुरुवात झाली. कुलदीप यादव याच्यानंतर शतकवीर रवींद्र जडेजा दोघे झटपट आऊट झाले. मात्र त्यानंतर आर अश्विन आणि ध्रुव जुरेल या दोघांनी लंच ब्रेकपर्यंत नाबाद 57 धावांची भागीदारी केली आहे. तर टीम इंडियाच्या 113 ओव्हरमध्ये 7 बाद 388 धावा झाल्या आहेत.