
IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने टॉसदरम्यान सांगितले की, विराट कोहली दुखापतीमुळे पहिल्या वनडेतून बाहेर आहे. कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याचवेळी जोस बटलरलाही प्रथम गोलंदाजी करायची होती. जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ अवघ्या ११० धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने सर्वाधिक ६ विकेट्स आपल्या नावावर केले. तर मोहम्मद शामीने ३ आणि प्रसिध्द कृष्णाने १ विकेट घेतला. या डावात इंग्लंडचे तब्बल ४ फलंदाज शून्यावर माघारी परतले. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी १११ धावांची गरज आहे.
Career-best ODI figures from Jasprit Bumrah – that was stunning 🔥https://t.co/khuchljoSR | #ENGvIND pic.twitter.com/b6jZtKGBkY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 12, 2022