India vs Bangladesh : ‘भारतीय क्रिकेटचा बाबर आझम…’ शुभमन गिलवर चाहते संतापले

WhatsApp Group

India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. दुलीप ट्रॉफी 2024 दरम्यान खराब फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलचा पुन्हा एकदा फ्लॉप शो पाहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी गिल खाते न उघडता बाद झाला. यानंतर चाहते गिलवर राग काढत आहेत. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संघाला गिलकडून दीर्घ खेळीची अपेक्षा होती, पण एकदा त्याने आपल्या खराब कामगिरीने चाहत्यांची निराशा केली.

निवड समितीने पुन्हा एकदा शुभमन गिलवर विश्वास व्यक्त केला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी तितकीशी चांगली नसली तरीही या कसोटी मालिकेसाठी त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. पण पहिल्याच दिवशी गिलला पहिल्या सत्रात केवळ 8 चेंडू खेळता आले. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून एकही चांगला शॉट दिसला नाही. 8 चेंडूंचा सामना करूनही गिल आपले खाते उघडू शकला नाही. यानंतर चाहते सोशल मीडियावर आपला राग काढत आहेत.

गिलची खराब कामगिरी पाहून चाहते रुतुराज गायकवाडचा कसोटी संघात समावेश करण्याची मागणी करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, म्हणूनच रुतुराज गिलपेक्षा चांगला आहे. गिल आता कसोटी संघातून बाहेर असल्याचे अनेक युजर्सचे म्हणणे आहे.

सध्या वृत्त लिहिपर्यंत बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांचा दबदबा दिसून येत आहे. कारण टीम इंडियाने पहिल्या सत्रातच आपले तीन मोठे फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या विकेट्स गमावल्या आहेत.