India vs Australia : भारताने 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली, ऑस्ट्रेलियाला हरवून रचला इतिहास

WhatsApp Group

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. केएल राहुलने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाने गेल्या 12 वर्षांपासून वानखेडेवर एकही वनडे सामना जिंकलेला नाही.या मैदानावर गेल्या वेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता तेव्हा टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव झाला होता. पण आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या पराभवाचा बदला घेतला आहे India Beat Australia By 5 Wickets.

पहिल्या वनडेत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कांगारूंचा संघ 35.4 षटकांत सर्वबाद 188 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 39.5 षटकांत 5 विकेट्स गमावून विजय मिळवला. या विजयात केएल राहुलचे तेरावे अर्धशतक आणि जडेजासोबतच्या 104 धावांच्या नाबाद शतकी भागीदारीचा मोलाचा वाटा आहे.

189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला काही विशेष कामगिरी करता आली नाही. एका टप्प्यावर संघाने 39 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. येथे इशान किशन 3, विराट कोहली 4 आणि सूर्यकुमार यादव 0 धावा काढून बाद झाले. अशा परिस्थितीत केएल राहुल (नाबाद 75), कर्णधार हार्दिक पंड्या (25 धावा) आणि मधल्या फळीत खेळायला आलेला रवींद्र जडेजा (नाबाद 45) यांनी संघाला सावरले. राहुलने प्रथम पंड्यासोबत 55 चेंडूत 44 धावा जोडल्या. त्यानंतर जडेजासोबत 122 चेंडूत 104 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला.