अंडर-१९ विश्वचषक: बांगलादेशचा पराभव करत भारताची सेमी फायनलमध्ये धडक!
अँटिगा – वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषकात ICC Under 19 World Cup शनिवारी खेळवलेल्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये भारतीय संघाने बांगलादेशला ५ विकेट्सनी पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयासह भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे India U19 won by wickets .
खेळल्या गेलेल्या या क्वार्टर फायनल सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १११ केल्या होत्या. भारताकडून रवी कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
विजयासाठी ११२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरेलेल्या भारतीय संघाने हा सामना ५ विकेट्स राखून आपल्या नावावर केला. भारतासाठी अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ४४ धावा केल्या.
India now win seven of their last nine U-19 WC quarterfinals!
Bangladesh made them work, but India make the semis where they meet Australia next ???? #INDvBAN | #U19CWC
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 29, 2022
हा सामना जिंकल्यामुळे भारत अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. सेमीफायनलमध्ये भारताची लढत आता ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना २ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे.
भारताने घेतला पराभवाचा बदला!
हा सामना जिंकून भारताच्या अंडर-१९ संघाने २०२० मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला आहे. २०२० च्या अंडर-१९ विश्वचषकात बांगलादेशने भारताला पराभवाचा धक्का देत विश्वचषक आपल्या नावावर केला होता.