India Attacks Pakistan: पहलगामचा बदला घेतला! भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला, 9 अड्डे उध्वस्त

WhatsApp Group

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पाकिस्तानकडून घेतला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारताने क्षेपणास्त्र हल्ल्यात मुझफ्फराबादसह पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानंतर काही वेळातच, भारत सरकारनेही या हल्ल्याची अधिकृतपणे पुष्टी केली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भारताने मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारताने पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला केला आहे. आता भारतीय लष्करानेही पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हा हल्ला करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला आहे.