IND Vs AFG: भारताची अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात

WhatsApp Group

अबु धाबी –  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आहे. केएल राहुल, रोहित शर्मा यांनी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतकी भागीदारी केली.

खराब फॉर्ममधून जात असलेल्या टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानसमोर २११ धावांचे तगडे आव्हान दिले होते.


टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी यादरम्यान शानदार फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. भारतासाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. दोघांनी मिळून अफगाणिस्तानविरुद्ध १४० धावांची भर घातली.


रोहित शर्मा ४७ चेंडूत ७४ धावा करून बाद झाला, त्याने ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. रोहित शर्माने आपल्या डावात १५७.४४ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. तर केएल राहुलने ४८ चेंडू ६९ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

२११ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र कर्णधार मोहम्मद नबीने ३५ तर करीम जनात नाबाद ४२ धावा करत चांगली झुंज दिली. अफगाणिस्तानला २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १४४ धावा करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ तर रवीचंद्रन अश्विनने २ विकेट्स घेतल्या